हद्दपार गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक

0

भुसावळ। गुन्हेगारी पाश्वभूमी असलेल्या दोन जणांना हद्दपार केल्यानंतरही ते भुसावळ शहर व परिसरात आढळून आल्याने दोघांना गुन्हे शोध शाखेच्या पथकाने अटक केली. गुन्हेगारी पाश्वभूमी असल्याने हिरामण उर्फ गोजर्‍या समरु जाधव व जय मुकेश ठाकूर (दोघे रा. भुसावळ) यांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपारीचे आदेश धुडकावून ते भुसावळ व परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

यांच्या पथकाने केली कारवाई
विविध प्रकारच्या गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार हिरामण जाधव व जय मुकेश ठाकूर यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांना हद्दपारीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे भुसावळ शहर हद्दीत त्यांचा वावर असणे कायद्याने बंधनकारक आहे. तरी देखील हे दोघे शहरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलीसांना मिळाली त्यानुसार सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नियुक्त करण्यात येऊन या दोघे गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला. पोलीसांना ते आढळून आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध शाखेचे सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, वाल्मीक सोनवणे, सुधीर विसपुते, विकास सातदिवे, संजय पाटील, प्रवीण ढाके, अनिल पाटील आदींनी ही कारवाई केली.