हद्दीतील समस्यांचे त्वरित निराकरणासाठी निवेदन

0

नवापूर । नगरपरिषद नवापुर हद्दीतील समस्यांचे त्वरित निराकरण करणेबाबतचे निवेदन नवापुर विकास आघाडीतर्फ मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे ,पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत,नायब तहसिलदार यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की नवापुर नगर परिषद हद्दीतील शहरातील नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच असुन नगर परिषद प्रशासन फक्त बघ्याची भुमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे.आम्ही दिलेल्या मागण्या त्वरित पुर्ण करुन मिळाव्यात अन्यथा नवापुर विकास आघाडीकडुन याबाबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देऊन अशावेळी कायदा व सुव्यवस्थेत बाधा झाल्यास सर्वस्वी जबाबदारी नवापुर नगरपरिषद यांची राहील, असे निवेदनात म्हटले आहे.

या आहेत मागण्या
(1) नवापुर शहरातील मुख्य रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असुन ती त्वरित दुरुती करुन मिळावी(2) शहरातील तसेच मुख्य बाजारपेठेतील सर्व सार्वजनिक मुतार्‍याची दुरुती व व्यवस्था करुन मिळावी व लाईट बाजार येथे नवीन मुतारीची व्यवस्था करुन मिळावी (3)पावसाळयापुर्वी नाल्यांची सफाई झाली नसल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्येत वाढ होत असुन ह्यावर त्वरीत उपाय योजना करुन मिळावी.(4) तदन्यां सल्या न घेताच शहरातील रस्ते बनवितांना नियमांचे उल्लंघन करुन रस्ते बनविल्यामुळे रस्त्यांची दोनच महिन्यात दयनीय अवस्था झाल्याचे निदर्शनास येत आहे तरी याबाबत त्वरित चौकशी होवुन कार्यवाही करण्यात यावी.(5) नागरिकांच्या विरोधामुळे शहरातील बंद असलेल्या रस्त्यांच्या कामांची चौकशी होवुन पुन्हा काम सुरु करण्यात यावे.या बाबत आमच्या उपरोक्त मागण्या पत्र प्राप्त झाल्यापासुन 15 दिवसांच्या आंत पुर्ण करुन कार्यालयीन अहवाल लेखी स्वरुपात मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात असे निवेदनामध्ये म्हटले आहे.निवेदनावर नवापुर विकास आघाडीचे अध्यक्ष संदिप पारेख,सचिव मंगेश येवले,उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे,अँड नितीन देसाई,धर्मेंद्र पाटील,राकेश सोनार,राहुल मराठे,रामु गिरासे,वनिता देसाई आदीचा सह्या आहेत.