हद्दीबाहेरील रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी

0

नवी मुंबई । मनपाच्या हद्दीबाहेरील व्यवसाय करणारे रिक्षाचालक हे नियम बाह्य व्यवसाय करत आहेत. त्यामुळे त्यांच्यात व प्रवाशांमध्ये नियमित भांडणे होत आहेत. याचा परिणाम स्थानिक रिक्षाचालकांवर होत असून त्यावर कारवाई करावी, अशी मागणी नवी मुंबई रिक्षा चालकमालक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी वाशी उपप्रादेशिक परिवहन परिवहन कार्यालयाकडे केली आहे. अशा आशयाचे पत्र गायकवाड यांनी परिवहन कार्यालयाला दिले आहे.

वेळीच कारवाई होणे गरजेचे
नवी मुंबई मनपा हद्दीत एम एच 2,3,4,46,47 आदी दुसर्‍या परिवहन नोंद असणारे रिक्षाचालक मनमानी भाडे आकारात असून नियम बाह्यपणे सर्वसामान्य प्रवाश्याना छळत असून आर्थिक भुर्दंड देत असल्याने यारीक्षा वर कारवाई करून त्यांना नवी मुंबईत व्यवसायास बंदी घालावी, अशी मागणीही उपप्रादेशिक कार्यालयाला दिलेल्या पत्रात सुभाष गायकवाड यांनी नमूद केले आहे. नवी मुंबईबाहेरील रिक्षाचालक स्थानिक रिक्षाचालकाना दमदाटी करून व्यवसाय करत आहेत. त्यामुळे भांडणा सारखे प्रकार घडत असल्याने एके दिवशी एखादा गंभीर गुन्हा होण्याची दाट शक्यता असल्याने या रिक्षाचालकांवर वेळीच कारवाई होणे गरजेचे आसल्याची पत्रात नमूद केले आहे.

सीवूड, नेरुळ रेल्वेस्थानक ठिकाणी रिक्षाचालक मोठ्या प्रमाणात
7 फेब्रुवारी रोजी एम एच 46 यजे 2483 क्रमांकाची रिक्षाचालकाने पारसिक हिल येथील अपोलो रुग्णालयापासून वाशी येथे जाण्यासाठी घेतलेल्या प्रवाशाकडून नियमबाह्य लंबसम 200 रुपयांची मागणी केली. त्या रिक्षाचालकाला स्थानिक रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे नेण्यास सांगितले असता त्यांनी आपल्या रिक्षामध्ये ठेवलेली सायकलीची चेन काढली व स्थानिक रिक्षाचालकांना मारहाण केली. वेळीच पोलीस आले म्हणून पुढचा अनर्थ टळला नाहीतर एखादी वाईट घटना घडली असती असेही पत्रात नमूद केले आहे. सीवूड रेल्वेस्थानक, नेरुळ रेल्वेस्थानक, नेरुळ सेक्टर 27, पारसिक हिल आदी ठिकाणीबाहेरील रिक्षाचालक मोठ्या प्रमाणात स्थानिक रिक्षाचालकांना दमदाटी करून रिक्षा चालवत आहेत. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात सांगितले, तर तुम्हीच त्यांना तुमच्या रिक्षा स्टँडवर रिक्षा लावून देऊ नका अशा प्रकारचे पोलिसांची भूमिका असल्याने आता तुम्हीच यावर तोडगा काढावा, असेही म्हणणे उप प्रादेशिक कार्यालयाला दिलेल्या पत्रात सुभाष गायकवाड यांनी म्हटले आहे. याबाबत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय वाशीचे सहाययक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांना विचारले असता, अशा प्रकारचे पत्र प्राप्त झाले असून, पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकार्‍याकडे पाठवले असल्याचे सांगितले.