रावेर । सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथे एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घृणास्पद कृत्याचा रावेर तालुका बंजारा समाजाने निषेध करून तहसीलदार विजयकुमार ढगे यांना निवेदन दिले.
सोयगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर बंजारा समाजात संतापाची लाट उसळली आहे. राज्यभर या प्रकरणाचा निषेध सुरू आहे. रावेरमध्ये एकत्र आलेल्या समाज बांधवांनी तहसीलदार ढगे यांना निषेधाचे निवेदन दिले. त्यात हा खटला चालवण्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना नियुक्त करावे, खटला फास्ट ट्रक न्यायालयात चालवणे, पीडित मुलीच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली. रवींद्र पवार, रामसिंग राठोड, प्रभू जाधव, सुरेश पवार, संतोष राठोड बंजारा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.