हनुमान दलित होते या वक्तव्यानंतर योगींनी दिली ही प्रतिक्रिया

0

प्रयागराज-उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रभू राम भक्त हनुमान हे दलित होते असे विधान केले होते. या विधानानंतर त्यांच्यावर बरीच टीका होत आहे. दरम्यान त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ज्या लोकांना धर्म आणि धर्मातील गोष्टी माहित नाही ती माणसे प्रत्येक गोष्टींचा संकोचित विचार करतात अशी प्रतिक्रिया योगींनी दिली आहे. संकोचित वृत्तीची माणसे या विषयावरून राजकारण करीत असल्याचे आरोप देखील योगींनी केले आहे.

प्रयागराज जिल्ह्यात आयोजित श्रीकुंभाभिषेकम् महोत्सवात आज ते बोलत होते. यावेळी सनातन परंपराबद्दल माहिती नसलेल्यांबद्दल प्रश्न निर्माण केले आहे.

श्रीकुंभाभिषेकम् महोत्सवात योगी आदित्यनाथ यांनी कोणाच्या कामावर बोट दाखविणे सोपे असते, दुसऱ्यांवर बोट दाखविण्यापेक्षा जर कर्तव्याची जाण ठेवली तर प्रगती होईल असा टोलाही योगींनी विरोधकांना लगावला.