हनुमान व्यायम शाळेला आमदार सावकारे यांची भेट

0

वरणगाव। आमदार संजय सावकारे यांनी येथील हनुमान व्ययाम शाळेला सदिच्छा भेट देऊन संपूर्ण व्ययाम शाळेची पाहणी केली. भुसावळ तालुक्यात वरणगाव सारखा आखाडा नसल्याचे आमदार सावकारे यांनी मान्य केले. याप्रसंगी आमदार सावकारे यांनी संपूर्ण जागेची पाहणी केली.

बांधकाम विभागाचे अभियंता एस.यु. कुरेशी यांना वरणगाव व्यायाम शाळेच्या नवीन इमारतीचा नकाशा आणि अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना आमदार सावकारे यांनी सुचना दिल्या आहे. अनेक पहेलवान व्यायाम शाळेतून आखाडा गाजवून नाव कमावल्याचा इतिहास आहे. आता लोकसहभागातून व्यायामशाळेची उभारणी करण्याची गरज आहे. याप्रसंगी व्ययामशाळेचे अध्यक्ष नगरसेवक सुनील काळे, उपाध्यक्ष शामराव धनगर, नामदेव मोरे, उत्तम भोई, ज्ञानेश्वर घाटोले, इफ्तेखार मिर्जा, मिलिंद मेढ़े, नगरसेवक गणेश धनगर, माजी उपसरपंच साजिद कुरेशी यांसह असंख्य पहेलवान उपस्थित होते.