भुसावळ– गर्दीचा हंगाम लक्षात घेता प्रवाशांची गैरसोय टळण्यासाठी 01664 व 01663 अप-डाऊन हबीबगंज-धारवार-हबीबगंज या विशेष गाडीच्या फेर्या 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आल्या आहे. 01664 हबीबगंज गाडी शुक्रवारी सुटेल. इटारसी, खंडवा, भुसावळ, मनमाड, दौंड, पुणे, मिरज व नंतर धारवार पोहचेल. 01663 ही गाडी शनिवारी सुटून मिरज, पुणे, दौंड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी व नंतर हबीबगंज पोहचेल.