VIDEO: “हम होंगे कामयाब” राजस्थानमधील आमदारांचा हॉटेलमध्ये अंताक्षरीचा खेळ !

0

जयपूर: कॉंग्रेस नेते सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यातील वाद टोकाला गेल्याने अखेर सचिन पायलट यांनी बंड पुकारत कॉंग्रेस सरकारला अडचणीत आणले. त्यानंतर कॉंग्रेसने सचिन पायलट आणि समर्थक आमदारांवर कारवाई केली. पायलट यांच्याकडील उपमुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष पद काढून घेण्यात आले. या राजकीय सत्तानाट्यात कॉंग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्या सर्व समर्थक आमदारांना एकाच हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. याठिकाणी आमदार विरंगुळा म्हणून अंताक्षरीचा खेळ खेळताय. “हम होंगे कामयाब- एक दीन” हे गाणे कॉंग्रेस आमदार गात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

राजस्थानमध्ये कॉंग्रेसला बहुमत चाचणीला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आमदारांनी “हम होंगे कामयाब”चा विश्वास दाखवला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्र यांची भेट घेत १०३ आमदारांचा पाठींबा असल्याचे पत्र दिले आहे. राज्यपालांनी आदेश दिल्यास बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.