हरचंद लांडगे नाही तर नोटीस बजावणारे येणार अडचणीत

0

अमळनेर । भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघांचा अमळनेरातीलच आपले भाजप कार्यकर्ते व शहराध्यक्ष हरचंद लांडगे यांच्यावर हल्ला चढवत हा अमळनेरातील वाघाचा अमळनेरातील लांडग्यावर हल्ला असल्याची मिश्कील टीका माजी भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. याबाबत माजी आमदार समर्थक कार्यकर्त्यांनी पत्रक काढून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दिलेली नोटीस अजून लांडगेंना नाही
त्यात ते म्हणतात कि, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी आपल्या कर्मचार्‍यांकडून शहराध्यक्ष हरचंद लांडगे यांना नोटीस बजावली असल्याचे वृत्त प्रसार माध्यमातून प्रसिद्ध केले. 30 नोव्हेंबर रोजी हि नोटीस एक आठवडा उलटूनही लांडगे यांना प्राप्त झाली नाही. परंतु वृत्त प्रसिद्धीला देऊन उदय वाघ यांनी पक्षांतर्गत बाबी चव्हाट्यावर आणून शहराध्यक्ष लांडगे, माजी आमदार डॉ.बी एस.पाटील यांची बदनामी केली. ज्यांच्याकडे पक्ष संघटनाची जबाबदारी आहे. तेच विघटन करायला निघाले असून हे कृत्य लांच्छनास्पद आहे. ती नोटीस जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे, कार्यालयीन मंत्री गणेश माळीच्या स्वाक्षर्‍याने आहेत.

विविध विषयावर झाले मंथन
कार्यालयीन सेवकांना पक्ष कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्याचा अधिकार कोणी दिला. स्वतःच्या सहीने जिल्हाध्यक्ष यांनी नोटीस पाठविण्याची हिंमत का दाखविली नाही. आम्ही भाजपचे प्रमुख कार्यकर्ते झुलाल पाटील, बजरंगलाल अग्रवाल, संतोष पाटील, समाधान धनगर, दिनेश माळी, लालचंद सैनानी, संजय शहा, प्रीतपालसिंग बग्गा, शामकांत भावसार, दिलीप साळी, जाकीर शेख आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

वरिष्ठांशी भेट घेवून खुलासा होणार
यावेळी या पत्रकासोबत लांडगे अडचणीत नाही तर भाजपतर्फे नोटीसा बजावणारे अडचणीत येणार आहेत. असे सांगत आमदार पाटील यांनी यावेळी बोलतांना म्हणाले कि लांडगे यांना शहराध्यक्ष पदावरून काढण्याचा अधिकार कुणास नाही. एखादा पदाधिकारी पक्षविरोधी काम करत असेल त्याला नोटीस देणे, त्याचा खुलासा मागविणे, त्यावर जिल्हा पदाधिकारी यांच्याशी चर्चा करणे पक्ष संघटनेत जर व्यवस्थित काम करत नसेल तर जिल्हा कमेटीला शिफारस करण्याचा अधिकार आहे. कोणाला पदावरून काढण्याचा अधिकार नाही. लांडगे हेच अधिकृत शहराध्यक्ष आहेत. व जिल्हा कोषाध्यक्ष लालचंद सैनानीच आहेत. यासंदर्भात कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष यांची भेट घेऊन याचा खुलासा करणार आहेत, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.