मुक्ताईनगर : तालुक्यातील हरताळे येथे चोरट्यांनी बंद घराला टार्गेट करीत 68 हजारांच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली. 20 डिसेंबर रोजी ही घटना घडली. वयोवृद्ध तक्रारदार हरी तुकाराम महाजन (75) हे मुक्ताईनगर येथे कामानिमित्त आले असताना व त्यांच्या पत्नी सुरत येथे गेल्या असताना चोरट्यांनी हरताळे गावातील घरी खिडकीचा गज वाकवून प्रवेश करीत घरफोडी केली.