मुक्ताईनगर : शहराकड़ून बोदवड गावाकडे जाताना नविन मुक्ताई मंदिर ते नर्सरीच्या दरम्यान काही दिवसांपूर्वी सकाळी 3.10 ते 3.30 च्या सुमारास पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने वन्यजीव प्रेमींमधे आनंदाची भावना असली तरी शेतकरी व मजुरांनी मात्र चिंता व्यक्त केली आहे.
तालुक्यातील अंतुर्ली येथील गायत्री पतसंस्थेचे संचालक नामदेव मिठाराम भोई हे रुग्णालयात जाण्यासाठी औरंगाबाद येथे सपत्नीक चारचाकी वाहनाने जात असताना सकाळीच 3.10 ते 3.30 वाजेच्या सुमारास मुक्ताई मंदिर ओलांडल्यानंतर नर्सरीच्या आधी ऐका छोट्या देवस्थानासमोर रस्त्यावर कुठला तरी प्राणी दिसला.सुरुवातीला सांबरचा भास झाला मात्र कार जवळ पोचल्यानंतर पट्टेदार वाघ रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात दिसून आला. वाघ रस्ता ओलांडत नर्सरीच्या दिशेने जात होता.
संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज
तालुक्यात कुर्हा वड़ोदा जंगलात पट्टेदार वाघाचे वास्तव्य जगजाहिर आहे. मुक्ताईनगर शहराजवळून जाणार्या हारताळे ते निमखेड़ी खुर्द दरम्यान बर्याचदा बिबट्याने दर्शन दिले आहे. मात्र प्रथमच पट्टेदार वाघाने या भागात दर्शन दिल्याने वन्यजीव प्रेमींमधे आनंदाचे वातावारण पसरले आहे. मुक्ताई मंदिर ते शीरसाळा फाट्यापर्यंत घनदाट जंगल असून विविध प्राणी सातत्याने आढळतात. त्यामुळे वाघासाठी यथायोग्य खाद्य या जंगलात उपलब्ध आहेच. मात्र प्रथमच मुक्ताईनगर शाहरापसुन केवळ 3 किमी अंतरावर पट्टेदार वाघ दिसल्याने वनविभागाने त्याची दाखल घेणे गरजेचे आहे. वाघाचे केवळ वास्तव्य महत्वाचे नसून त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करने गरजेचे आहे. भोई यांना केवळ एकाच वाघाने दर्शन दिल असले तारी त्याचे सोबत अन्य मादी अथवा नर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन्यजीव प्राण्यांसाठी मुक्ताईनगर वनविभागाने हरताळे व माळेगाव येथे विविध स्तुत्य अशा सोई केल्या आहेत. उन्हाळ्यात प्राण्यांना पाणी मिळावे म्हणून कृत्रिम तलाव, गवत यासारख्या सुविधांमुळे प्राणी आकर्षित होत आहेत.