जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा
भुसावळ- मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे गावातून तीन तलवारींसह एक चॉपर जप्त करण्यात आला. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. हरताळे गावातील वंजारवाडा भागातील सैय्यद लुकमान सैय्यद (45) व सैय्यद अहमद सै.मोहम्मद (30) अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.