हरबरा पेटला, सव्वादोन लाखांचे नुकसान

0
किन्ही शिवारातील घटना ; शेतकर्‍यावर संकट
भुसावळ- तालुक्यातील किन्ही शिवारातील शेत गट नंबर 517 मधील हरभर्‍याला अचानक आग लागल्याने दोन लाख 30 हजारांचे नुकसान झाले. 9 रोजी रात्री दहा वाजेनंतर ही घटना घडली. आगीचे कारण कळू शकले नाही. या संदर्भात संजय अनंत बढे (44, मांडवेदिगर आश्रमशाळा) यांनी तालुका पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. तपास हवालदार रीयाज शेख करीत आहेत.