बोदवड : यशोदाई अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लि.वराड, ता.बोदवड यांच्यामार्फत नाफेड महाएफपीसी अंतर्गत शासकीय तूर, हरभरा खरेदीचा शुभारंभ गुरुवार, 3 रोजी झाला. शासकीय हमी भाव 5230 रुपये प्रति क्विंटल या भावाने चना (हरभरा) खरेदी होणार आहे. शेतकरी बाळकृष्ण पाटील यांचा हरभरा खरेदी करून व त्यांचा सत्कार झाल्यानंतर काटापूजन करीत प्रत्यक्षात खरेदीला सुरुवात करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी अनिल खंडेलवाल, बाबूराव पाटील, रामराव पाटील हिंगणे, कंपनीचे चेअरमन पुरुषोत्तम पाटील, भाऊराव पाटील, कंपनीचे सीईओ निलेश भाऊराव पाटील, बाळू पाटील (चिंचखेड), साहेबराव पाटील, माधवराव पाटील, शांताराम मोझे, विनोद काळे, फारुख शेख, धनराज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विशाल चौधरी, विजय पाटील, सौरभ पाटील,राजेश चौधरी, रवी मराठे आदी व शेतकरी कार्यक्रमाला उपस्थित होते. हरभरा खरेदी सहजरीत्या होईल फक्त शेतकरी बांधवांनी 7/12 उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक देऊन ऑनलाइन करून घ्यावे व हरभरा मोजणीसाठी तात्काळ आणावा, असे आवाहन निलेश पाटील यांनी केले आहे.