नाफेडतर्फे खरेदी ; 4400 रुपयांचा भाव
रावेर:- नाफेडमार्फत हरभरा खरेदी केंद्राचे काटा पूजन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार अरुण पाटील, उपसभापती अरुण पाटील, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी, जिल्हा परीषद सदस्य आत्माराम कोळी, कैलास सरोदे, माजी नगराध्यक्ष हरीष गणवानी, पंचायत समिती सदस्य गोपाळ नेमाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गोंडू महाजन, श्रीकांत महाजन, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन जिजाबराव पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, संजय गांधी अध्यक्ष शिवाजीराव पाटील, मॅनेजर विनोद चौधरी, सचिव गोपाळ महाजन, प्रशांत पाटील, महेश चौधरी, सूर्यभान चौधरी आदी उपस्थित होते.
25 टक्केची अट रद्द करावी
शासनाने एकूण उत्पन्नाच्या 25 टक्के खरेदी करण्याची अट रद्द करावी तसेच हेक्टरी दहा क्विंटलऐवजी पंधरा क्विंटल करण्यात यावी, असे प्रतिपादन कृषी उपन्न बाजार समितीचे सभापती निळकंठ चौधरी यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
हरभर्याला 4400 चा भाव
आतापर्यंत तालुका भरातील सुमारे एक हजार 880 शेतक-यांनी हरभरा देण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. प्रत्यक्षात नाफेड मार्फत खरेदीला सुरुवात झाली असून शासना तर्फे हरर्याला चारचार हजार चारशेचा भाव देण्यात आला आहे.