हरयाणात धुक्यामुळे ट्रक आणि कारचा अपघात; 7 जणांचा मृत्यू

0

नवी दिल्ली : हरयाणात दाट धुक्यामुळे ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. अंबाला-चंदीगड मार्गावर शनिवारी 29 डिसेंबर रोजी सकाळी हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदीगडवरून येणाऱ्या दोन कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. दाट धुके असल्याने हा अपघात झाला आहे. याआधीही हरयाणामध्ये दाट धुक्यामुळे 50 गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला होता.