हरलो तर ईव्हीएममुळे

0

नवीदिल्ली । दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचे निकाल येण्यास अद्याप दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मतदानानंतरच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आम आदमी पक्षात सध्या चिंतेचे वातावरण आहे. आम आदमी पक्षाने निवडणूक निकाल आम आदमी पक्षाच्या बाजूने असतील, अस विश्‍वास व्यक्त केला आहे. मात्र ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा पुनरुच्चार करत ईव्हीएममुळे भाजपला यश मिळू शकते, असे म्हटले आहे. ‘ईव्हीएममुळे एक्झिट पोलमधील अंदाज खरे ठरु शकतात. ईव्हीएमचा करिश्मा चालल्यास आमचा पराभव होईल. मात्र जर जनतेचा करिश्मा चालला, तर आम आदमी पक्ष दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरेल आणि मोठ्या अंतराने विजयी होईल,’ असे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी म्हटले आहे.