पिंपळनेर। सुमारे 3 महिन्यापूर्वी पंढरपूर येथून बेपत्ता झालेला लहान बालक-गोकुळ आनंदा आहिरे(16) रा.देशशिरवाडे, ता.साक्री हा कर्नाटक पोलिस व सामाजिक कार्यकर्ते यांना मिळून आल्याने त्यांनी त्यास रिमांड होम धुळे येथे दाखल केले. त्याच्या पालकांचा शोध घेणेबाबत पिंपळनेर पोलिसांना कळविल्यानुसार त्यांनी त्याचे पालकांचा शोध घेतला असता त्याचीआई-भिकूबाई आनंदा अहिरे ही मिळुन आल्याने तिला सविस्तर रिपोर्टसह रिमांड होम, धुळे येथे हजर केले असता. त्याला त्याच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले.
याकामी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल भाबड व त्यांचे सहकारी पोलिस हेड कॉन्स्टेबल डी.डी.मोरे, पोलीस नाईक ललित पाटील व पोलिस पाटील देशशिरवाडे ,प्रकाश शेळके यांनी प्रयत्न केले.