हरवलेल्या बालकाच्या माता-पित्यांना शोधणार्‍या व बनावट तिकीट निरीक्षकांना पकडणार्‍या कर्मचार्‍यांचा गौरव

0

भुसावळ- हरवलेल्या बालकाच्या माता-पित्यांना शोधणार्‍या व बनावट तिकीट निरीक्षकांना पकडणार्‍या कर्मचार्‍याचा डीआरएम आर.के.यादव यांच्या हस्ते मंगळवारी रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला. 4 जानेवारी रोजी पुष्पक एक्समध्ये नऊ वर्षीय बालकाची आई-वडीलांपासून ताटातुट झाली होती तर कर्तव्यावरील खंडव्याचे तिकीट निरीक्षक जगदीशकुमार यादव यांनी या बालकाची सतर्कता दाखवत कुटुंबियांशी भेट घडवून आणली होती तसेच मनमाड विभागातील वरीष्ठ पार्सल लिपिक विजय श्रीपत सोमिते यांनी 18 जानेवारी नकली तिकीट निरीक्षकाला पकडण्याची सतर्कता दाखवल्याने दोघाही कर्मचार्‍यांचा मंगळवारी डीआरएम कार्यालयात डीआरएम आर.के.यादव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रसंगी रेल्वे सिनी.डीसीएम सुनील मिश्रा यांची उपस्थिती होती.