भुसावळ। मुंबई येथी मुलुंडमधील रहिवासी चंद्रकांंत अडल यांचा 13 वर्षीय मुलगा अथर्व हा रागाच्या भरात घर सोडून निघाला होता. त्यास 28 रोजी सायंकाळी येथील रेल्वे कर्मचारी सुनिल आंबळे यांना हा मुलगा संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्यांनी विचारपूस केली असता अथर्वने सर्व खुलासा केल्यानंतर त्यास शहर पोलीस ठाण्यात नेवून पोलिसांच्या स्वाधिन केले.
पोलिसांनी संपर्क साधून दिली माहिती
पोलिसांनी पालकांशी संपर्क साधून मुलाबद्दल माहिती दिली. त्यामुळे अथर्वच्या आई, वडिलांनी लागलीच भुसावळ गाठून शहर पोलीस ठाण्यात आले असता पोलिसांनी या मुलास आई, वडिलांना सुपुर्द केले.