हरिकृष्णाचा विजय

0

बिएल । भारताच्या पी. हरिकृष्णाने चिवट झुंजीनंतर तीनवेळा महिलांच्या जागतिक विजेतेपद मिळवणार्‍या चीनच्या ग्रॅण्डमास्टर होउ यिफानचा 50 व्या बिएल आंतरराष्ट्रीय चेस फेस्टीव्हल स्पर्धेतील सहाव्या फेरीच्या लढतीत पराभव केला. पांढर्‍या सोंगट्यांनी खेळणार्‍या हरिकृष्णाला सुरुवातीला यिफानच्या आक्रमक खेळाचा सामना करायला लागला. पण डावातील 38 व्या चालीनंतर हरिकृष्णाने सामन्यात वर्चस्व मिळवायला सुरुवात केली. सामन्यानंतर हरिकृष्णा म्हणाला की, दोघांनाही सुरूवातीला विजयाची संधी होती. पण 38 व्या चालीनंतर सामन्याचे चित्र पालटले.