हरिकृष्ण दुसर्‍या स्थानावर

0

जिनेव्हा । भारताचा ग्रॅण्डमास्टर पी. हरिकृष्णाने जिनेव्हा फिडे ग्रापी बुद्धिबळ स्पर्धेतील चौथ्या फेरीअखेर दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. चौथ्या फेरीतील लढतीत हरिकृष्णाने गुण तालिकेत आघाडीवर असलेल्या अझेरबैजान तैमूर राद्जाबोव्हला बरोबरीत रोखले. चार लढतींमधील हरिकृष्णचा बरोबरीत सुटलेला हा तिसरा सामना होता. जागतिक क्रमवारीत 22 व्या स्थानावर असलेल्या हरिकृष्णाने काळ्या मोहर्‍यांनी सुरुवात केली. आक्रमक चाली रचत हरिकृष्णाने तैमूरला अडचणीत आणण्याचे अनेक प्रयत्न केले पण तैमुरने आपला बचाव अभेद्य राखला. सुमारे दिड तासानंतर या दोघांनी बरोबरी मान्य केली.