जळगाव। खानदेशाची राजधानी म्हणून ओळखले जाणार्या जळगाव शहराला आता एक नवी ओळख मिळणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्यात येत आहे. या अभियानात जळगाव शहराचा समावेश करण्यात आला आहे.
त्यानुसार सन 2016-17 या आर्थिक वर्षाच्या राज्य वार्षिक कृति आराखड्यास केंद्र शासनाने मान्यता दिली असून या आराखड्यामध्ये जळगाव शहराच्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी 1 कोटी 50 लक्ष रुपयांच्या प्रकल्पास प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित झाला आहे.