इंदूर । हरित नोहने एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय सुपरक्रॉस मालिकेतील विजेतेपद जवळपास नक्की केले आहे. इंदूरच्या फेरीत प्रकाशझोतात त्याने दोन्ही मोटो जिंकत नजीकचा प्रतिस्पर्धी सी. डी. जीनन याच्यावर मात केली. सर्वोत्तम रायडरचा किताबही हरितने मिळविला. आंतरराष्ट्रीय गटात अलेक्झांडर टोन्कोवने दोन्ही मोटो जिंकले. ज्युनियर गटात पुण्याच्या युवराज कोंडेदेशमुखने दोन्ही मोटो जिंकले. या फेरीत आंतरराष्ट्रीय रायडरच्या जोडीला स्टंटही झाले. 20 वर्षांत इंदूरला प्रथमच अशी स्पर्धा झाली, त्यामुळे प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला, असे मालिकेचे प्रवर्तक गॉडस्पीडचे संस्थापक संचालक श्याम कोठारी यांनी सांगितले.