आळंदी : येथील माउली मंदिरात आषाढी यात्रेला पालखीचे प्रस्थान नंतर परंपरांचे पालन करीत हरिपाठ कीर्तन मालिकेस धार्मिक वातावरणात सुरुवात करण्यात आली असल्याचे व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले.भाविकांकडून यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. विष्णू महाराज चक्रांकित महाराज यांच्या कुटुंबाकडे परंपरेने सेवा आहे. त्यांच्यावतीने कीर्तन सेवेस सुरुवात करण्यात आली आहे. चक्रांकित महाराज यांचे वतीने जगदीश महाराज जोशी यांचे सुश्राव्य कीर्तन श्रवणास पंचक्रोशीतून भाविकांची गर्दी होत आहे. वीणा मंडपात हरिपाठावर कीर्तन होत आहेत. पालखी पुन्हा मंदिरातील येई पर्यंत परंपरेने कीर्तने होणार आहेत, असे व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले.