हरियाणाच्या मुख्यमंत्री विरोधात खोटी माहिती पसरविणाऱ्या ‘आप’च्या दोन प्रभारींना अटक

0

चंदीगड-हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट््टर यांच्या विरोधात खोटी माहिती पसरविणाऱ्या आम आदमी पक्षाच्या दोन मीडिया प्रभारींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सिरसा जिल्ह्यातील कालांवाली मीडिया प्रभारी तरसेम कांबोज आणि हांसी येथील ‘आप’चे सोशल मीडिया प्रभारी हरपाल क्रांति यांचा समावेश आहे.

हरियाणामध्ये आम आदमी पक्षाने खोटी माहिती पसरवित सरकारला व मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे असे आरोप होत आहे. दरम्यान पोलिसांनी ‘आप’च्या ७० कार्यकर्त्यांना अटक केली आहे असे आरोप ‘आप’कडून करण्यात आले आहे.

पक्षाध्यक्ष नवीन जयहिंद यांनी सरकारच्या इशाऱ्यावर पोलीस कारवाई करत असून आपच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचे आरोप केले आहे.