भुसावळ । डेरा सच्चा सौदाप्रमुख गुरमीत रामरहिम सिंह यांना पंचकुला (हरियाणा) सीबीआय न्यायालयाने बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी मानल्याने व 28 रोजी शिक्षा देण्याचा निर्णय राखून ठेवल्यानंतर या भागात हिंसाचार उसळला असून आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला आहे तर आणखी उद्रेक होण्याची भीती असल्याने रेल्वे प्रशासनाने 26 ते 28 दरम्यान 13 रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे तर आणखी काही रेल्वे गाड्या रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रेल्वे गाड्या अचानक रद्द झाल्याने रेल्वेला कोट्यवधींचा फटका बसला असून प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. दरम्यान, 26 रोजी डाऊन 11057 मुंबई-अमृतसर पठाणकोठ व 12137 मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल एक्स्प्रेस आग्रा स्थानकापर्यंत धावली.
या रेल्वे गाड्या झाल्या रद्द
26 रोजी रद्द झालेल्या गाड्यांमध्ये अप मार्गावरील 11078 जम्मूतवी-पुणे झेलम एक्स्प्रेस, 22686 चंदिगड-यशवंतपूर कर्नाटक एक्स्प्रेस, 12716 अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस, 11058 अमृतसर-मुंबई पठाणकोट एक्स्प्रेस, 22456 साईनगर-शिर्डी कालका एक्स्प्रेस, डाऊन 22685 यशवंतपूर-चंदिगड, 15715 नांदेड-अमृतसर सचखंड, 12512 चेन्नई-गोरखपूर एसएफ एक्स्प्रेस तर 27 रोजी सुटणारी 12519 एलटीटी-कामाख्या एक्स्प्रेस, 28 रोजी सुटणारी कल्याण-पुणे एक्स्प्रेस, 30 रोजी सुटणारी 12511 राप्ती सागर एक्स्प्रेस तसेच 15646 गुवाहाटी-मुंबई एक्स्प्रेस, 31 रोजी सुटणारी 12520 कामाख्या-एलटीएटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.