हरीभाऊ जावळे लवकरच ‘नामदार’!

0

रावेर (शालीक महाजन)  । आमदार हरीभाऊ जावळे यांचे नशीब सध्या जोरावर असून ते लवकरच नामदार होतील असे वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. राज्य मंत्री मंडळाचा विस्तार होऊ घातला असतांना ना. महाजन यांनी केलेले हे वक्तव्य अतिशय महत्वाचे मानले जात आहे. यामुळे नाथाभाऊंच्या मंत्रीमंडळातील संभाव्य प्रवेशाचे काय? हा प्रश्‍नदेखील चर्चेला आला आहे.

काय म्हणाले गिरीशभाऊ ?
येथील सरदार जी जी हायस्कूल शाळेच्या शॉपिंग कॉम्पलेक्सच्या उद्घाटन कार्यक्रम शनिवारी पार पडला. यावेळी ना. गिरीशभाऊ म्हणाले की, “मला अनेक जण मुख्यमंत्री श्री फडणवीस यांचा जवळचा असल्याचा समज करून अनेक जण आ हरिभाऊ जावळे यांना मंत्रीमंडळात समावेश करावा यासाठी माझ्याकडे आग्रह धरतात सध्या हरिभाऊ जावळे यांचा योग व नशिब जोरावर असल्याने त्यांचा लवकरच होणार्‍या मंत्रीमंडळ विस्तारात समावेश होणार आहे.”

खडसेंच्या पुनर्वसनावर प्रश्नचिन्ह?
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर आरोप झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता त्यांना अनेक आरोपातून क्लीन चीट सुद्धा मिळाले आहे त्यामुळे त्यांचे पुनर्वसन लवकरच करावे अशी कार्यकर्त्यांची मागणी पक्षातूनही असून त्यांच्या पुनर्वसनाचे पक्षातून वेळोवेळी संकेत दिले जात आहे एकनाथराव खडसे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा प्रश्न ऐरणीवर असताना आमदार हरिभाऊ जावळे यांना मंत्रिमंडळात सामावेश होण्याचे संकेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याने श्री खडसे यांचा पुनर्वसनाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.