हरीविठ्ठलनगरात तरुणाला मारहाण; दोन जणांवर गुन्हा

जळगाव – आईला शिविगाळ करणार्‍यांना जाब विचारल्याच्या कारणावरुन हरिविठ्ठलनगरातील तरुणाला मारहाण करण्यात आली. डोक्यावर बाटली फोडून त्या तरुणास जखमी केले. ही घटना रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास हरिविठ्ठलनगरातील रेल्वे पुलाजवळ घडली.
हरिविठ्ठलनगरातील रेल्वे पुलाजवळ विक्की संजय अहिरे (वय 19) हा तरुण त्याची आई सुरेखाबाई संजय अहिरे व भाऊ नीलेश संजय अहिरे यांच्यासोबत राहतो. हरिविठ्ठलनगरातील भिलवाडा परिसरातील सतीश संजू पाटील (राजपूत-वय-25) व नितीन संजय बारी (वय 27) हे सुरेखा अहिरे यांना शिविगाळ करीत होते. आईला शिविगाळ का करतो? असे विक्कीने विचारले असता सतीशने विक्कीच्या कानशिलात लगावली. तर डोक्यावर बाटली मारुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल ललित भदाणे करीत आहेत.