हरोलीत सरपंचाची घराशेजारीच हत्या

0

सांगली । कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोलीचे सरपंच युवराज पाटील यांची बुधवारी रात्री घराशेजारीच हत्या झाली.युवराज पाटील हे देशिंग गावाहून चारचाकीने हरोलीतील घरी जात होते.

घरासमोर गाडी लावून ते घराकडे निघाले असताना अंधारात दबा धरुन बसलेल्या 5 हल्लेखोरांनी त्यांच्या मान आणि डोक्यावर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. युवराज पाटील हे शिवसेनेचे कवठेमहांकाळ तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांचे बंधू आहेत. युवराज पाटील हे शिवसेनेचे पदाधिकारीही होते. युवराज पाटील यांच्या हत्येचें नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलें नाही.