हर चेहरे के आगे थक चुका हू मुस्कुराके लिहित तरुणाने घेतला गळफास

A young man of Kingaon committed suicide in Thane by writing a suicide note यावल : तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी असलेल्या 22 वर्षीय तरूणाने वर्तक नगरातील मामांच्या घरी आत्महत्या केली. गणेश अनिल निंबायत असे या तरूणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाइड नोट लिहत निराशा व्यक्त केली आहे.

गोदरेज कंपनीत होता कार्यरत
किनगाव बुद्रुक, ता.यावल येथील रहिवासी गणेश अनिल निंबायत (22) हा तरुण ठाणे (मुंबई) येथे गोदरेज कंपनीत नोकरीला होता. गणेशने बुधवारी पहाटेपुर्वी मामाच्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली. तत्पूर्वी चिठ्ठी लिहित मी एक जवाबदार मुलगा होवू शकलो नाही, मी एक जवाबदार भाऊ होवू शकलो नाही असे लिहून आपली निराशा स्पष्ट केली आहे. तरुणाच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परीवार आहे. त्याचा मृतदेह बुधवारी रात्री किनगावात आणून अंतसंस्कार करण्यात आले.

इंग्रजीत लिहिली सुसाईड नोट
चुपचुपके रोया मेरी परेशानी छुपा के, हर चेहरे के आगे थक चुका हू मुस्कुराके.. अशी सुरवात करीत सामान्य कुटुंबातील या तरूणाने इंग्रजी भाषेत सुसाइड नोट लिहत आपण जवाबदारी पार पाडू शकलो नाही, असे सांगत एक पक्षाचे चित्र रेखाटून तुमचा पक्षी उडाला, असा संदेश कुटुंबास दिला आहे.