हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमली मंदिरे

0

 भुसावळ । महाशिवरात्रीनिमित्त येथील यावल रोडवरील प्रजापिता ब्राम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय केंद्रातर्फे संस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेविका मीना लोणारी, सुदाम बठेजा व गाडगेबाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक धनपाल, केंद्राच्या प्रमुख सिंधु दिदी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सिंधुदिदी यांनी शिवबाबा व परमात्मा विषयी माहिती उपस्थितांना करुन दिली व ईश्वरीय संदेश दिला. मंचावरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

नृत्य कार्यक्रम
याप्रसंगी नंदिनी चौधरी, डिम्पल गाढे व श्वेता यांनी विविध आध्यात्मीक गीतांवर नृत्य सादर केले. तर आर्यन गाजरे याने ईश्वरावरती गाणे सादर केले. डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात केंद्रातर्फे भित्तीचित्र प्रदर्शन लावण्यात आले होते यावेळी उद्यानात असलेल्या महादेव मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी या प्रदर्शनीला भेट दिली.

यांनी घेतले परिश्रम
या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन ज्योती दिदी यांनी केले तर यशस्वीतेसाठी दिपू दिदी, अनिल शिंदे, नाना पाटील, पंडीत सुरवाडे, दिलीप, नितीन चौधरी, अरविंद गाजरे, रितेश आदींनी परिश्रम घेतले.