मुक्ताइनगर : हलखेडा जंगलात कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील (कागल, ता.जि.कोल्हापूर) यांचा पैशाच्या वादातून खून करण्यात आला होता. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात अन्य तीन आरोपींना मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील एकूण आरोपींची संख्या पाच झाली आहे. सागर सुनील पवार (26, रा.महालखेडा सिनफाटा), फिरोज कामाजी पवार (20, रा.मधापुरी, ता.मुक्ताईनगर) तसेच ईशेष उर्फ इशा लक्ष्मण भोसले (22, रा. चाळीसगाव फाटा, मालेगाव) अशी अटकेतील तिघा आरोपींची नावे आहेत.
जंगलात मारहाण करीत केला खून
माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील (52, सावर्डे बु.॥, ता.कागल, जि.कोल्हापूर) व अनिल आनंदा निकम (41, सावर्डे बु.॥, ता.कागल, जि.कोल्हापूर) हे 5 रोजी शेगाव दर्शनासाठी निघाल्यानंतर नांदुरा येथून त्यांचे अपहरण करून वढोदा जंगलात नेण्यात आले. पैशांच्या वादातून आधीच गावाजवळील जंगलात उपस्थित असलेल्या सहा ते जणांच्या टोळक्याने उभयंतांना मारहाण केली व त्यात प्रल्हाद पाटील यांचा मृत्यू झाला होता. मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा वर्ग झाल्यानंतर सुरूवातीला दादाराव हरबन्सी पवार व अजय दादाराव पवार या बाप-लेकांना अटक करण्यात आली होती.