हलगीच्या तालावर सागर पार्क येथे रंगली कुस्त्यांची दंगल

0

केशवस्मृती प्रतिष्ठान, श्रीराम मंदिर संस्थान आणि रथोत्सव समितीतर्फे आयोजन
मध्यप्रदेशातील भारती बर्गे या महिला पहिलवानाने महाराष्ट्राच्या पहेलवानाने केले चितपट

जळगाव । शहरातील सागरपार्कवर कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. या दंगलींमध्ये अनेक राज्यातील पहेलवांनी आपले कसब दाखवीत होते. दरम्यान हलगीच्या तालावर पहेलवानांचा देखील उत्साह संचारला होता. केशवस्मृती प्रतिष्ठान, श्रीराम मंदिर संस्थान आणि रथोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सागरपार्कवर कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 3 वाजेपासून कुस्तीला सुरुवात झाली. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे, भानुदास विसावे यांनी महिलांची मध्यप्रदेश व महाराष्ट्र यांच्यात जोड लावली.

देशभारतील पहिलवानांचा सहभाग
महिलांच्या या दंगलीत मध्यप्रदेशमधील भारती बर्गे या महिला पहेलवानने महाराष्ट्राच्या पहेलवानला चितपट करीत आस्मान दाखवित भारती बर्गे ही महिला विजेती ठरली. तसेच याठिकाणी लहान मुलांच्या कुस्ती देखील चांगल्याच रंगल्या होत्या. कुस्त्यांमध्ये उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली, हरियाणा येथील नामवंत कुस्तीपटू सहभागी झाले होते. तसेच पंजाब मधील गनी अली पेहलवान, हरियाणा येथील महान भारत केसरी प्रवीणसिंग सोनीपत पहेलवान, दिल्ली येथील निर्मल देशवल पेहलवान, पंजाब येथील हरिष डांगर यांसह जळगावमधील कल्पेश मराठे आणि नितीन गवळी आदी पहेलवानांची लढत रंगतदार झाली.

हलगीने वाढविली कुस्तींमध्ये रंगत
कुस्ती म्हटली म्हणजे हलगी आली. कुस्त्यांमध्ये जसजशी चुरस वाढत होती. तसे तसे हलगीच्या ताल कुस्तींपटूंमध्ये उत्साहत संचारत होता. त्यामुळे हलगीने कुस्तींमध्ये रंगत वाढविली होती.