हल्ला करणार्‍यांवर कारवाईची मागणी

0

अमळनेर । अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघातर्फे मुंबई येथील डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर खारघर येथे 3 अज्ञात लोकांनी प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. अज्ञातांना अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड यांना लेखी निवेदन देण्यात आले.

अज्ञात आरोपींवर भादवी कलम 307 प्रमाणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असा गुन्हा दाखल करून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत काटे, सचिव चंद्रकांत पाटील, सदस्य संजय पाटील, योगेश महाजन, चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, जितेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, अमोल पाटील, मुंन्ना शेख, महेंद्र पाटील, भटेशवर वाणी, पांडुरंग पाटील, हिरालाल पाटील यांनी केली आहे.