हल्ल्याच्या गुन्ह्यात 26 आरोपी निर्दोष

0

जळगाव । चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पो.नि. लक्ष्मण गायकवाड यांच्यासह 18 पोलीस कर्मचार्‍यांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी बिलाखेड (चाळीसगाव) येथील 26 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या खटल्याची चौकशी होऊन सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने 26 जणांना दोषमुक्त केले. जिल्हा सत्र न्यायालयात साक्षीदाराची चौकशी केल्यानंतर न्यायालयाने या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे.

9 डिसेंबर 2011 ची घटना
याप्रकरणी भिकन पाटील, किसन पाटील, राकेश पाटील, नवनाथ गोसावी, गोपाल पाटील, नथु पाटील, सचिन पाटील, प्रवीण पाटील, सोमनाथ पाटील, बापू रावते, प्रकाश पाटील, किशोर पाटील, वाल्मिक पाटील, सुनील पाटील, हेमंत पाटील, शरद पाटील, भारत पाटील, रमेश पाटील, अमोल पाटील, संदिप पाटील, सुनील डी.पाटील, अनिल पाटील, सुनील जगताप, योगेश पाटील अशा 26 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना 9 डिसेंबर 11 रोजी घडली होती. दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर खटल्याची चौकशीचे कामकाज न्या. के.पी.नांदेडकर यांच्या न्यायालयात चालले. खटल्यात एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या जबानीतील तफावती, व अविश्वासार्हता तपासकामातील त्रुटी आदी बाबींचा विचार करून न्यायालयाने सर्व आरोपींना दोषमुक्त केले. आरोपींतर्फे ड. वसंत आर.ढाके व अ‍ॅड. भारती ढाके यांनी कामकाज पहिले.