मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या सिल्व्हर ओक येथील घरावरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 110 एसटी कर्मचार्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून या हल्ल्यासाठी चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली त्यांचे नेते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
किल्ला कोर्टाने सुनावली पोलिस कोठडी
सोमवार, 11 एप्रिल रोजी किल्ला कोर्टात त्यांना हजर करण्यात येणार आहे. पवारांच्या घरावर हल्ला करणार्या कर्मचार्यांना आणि सदावर्ते यांनी शुक्रवारी रात्री गावदेवी पोलिसांनी अटक केली. शनिवारी किल्ला कोर्टात त्यांना हजर करण्यात आले असता सदावर्ते, कर्मचारी, पोलिस अशा तीन पक्षांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली. या हल्ल्याचा घटनाक्रम व त्यामागे सदावर्ते यांची चिथावणी कारणीभूत आहे का? याची तपासणी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी त्यांची 14 दिवसांची कोठडी मागितली.
असा झाला युक्तीवाद
अॅड. सदावर्ते यांच्या वकिलांनी न्यायालयात यायालयातच असल्याचे सांगत घटनास्थळी नव्हतो, असा दावा केला शिवाय घटनेनंतरही पळून गेलो नाही, मी घरीच होतो, मधुमेह व रक्तदाब यामुळे आपल्याला जामीन मिळावा, अशी मागणी केली तर सरकारी वकिलांनी हल्ल्यामागील सूत्रधाराचा तपास करण्यासाठी सदावर्ते यांची 14 दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, सीसीटीव्हीमधील पुराव्यांनुसार हा हल्ला पूर्वनियोजित कर्मचारी व सदावर्ते यांच्यातील संभाषणाचा तपास बाकी असल्याचे न्यायालयाला सांगितले.