भुसावळ । महिला मंडळातर्फे हळदीकुंकवाच्या कार्यक्रमावर होणारा अतिरिक्त खर्च टाळून यातून विधवा व परितक्त्या महिलांना उपजिविका चालविण्यासाठी प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे देण्यात आली. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी महिला मंडळातर्फे दरवर्षी हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेतला जात असतांना या कार्यक्रमात सौभाग्यवतींना वाण देणे, संगीत खुर्चीचा कार्यक्रम घेणे यासह विविध उपक्रम राबविले जात होते.
खर्चाला दिला फाटा
मात्र यावर होणारा खर्च हा विधायक कार्यात लावण्यासाठी या कार्यक्रमांना तिलांजली देेत यावर्षी हळदीकुंकवाच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात विधवा व परितक्त्या महिलांना स्वावलंबी होण्याकरीता सतकोर भगवानसिंग छाबडा व मिना गाडेकर यांना 10 हजार रुपयांची मदत देण्यात आली. याप्रसंगी सरला ठोसर, लता सोनवणे, मनिषा काकडे, अर्चना सोनवणे, भारती वानखेडे, सिमा सावकारे, अनिता अंबेकर, अलका भटकर, सुनंता भारुडे यांसह परिसरातील महिला उपस्थित होत्या.