हवाई दलाचे जवान दाढी ठेवू शकत नाहीत

0

नवी दिल्ली – हवाई दलाचे कर्मचारी सेवेत असेपर्यंत दाढी वाढवू शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटत धार्मिक आधारावर दाढी वाढवल्याने भारतीय हवाई दलातून निलंबित करण्यात आलेल्या जवान मकतुम हुसेन यांनी केलेली मुख्य न्यायाधीश टी एस ठाकूर यांनी फेटाळली आहे.

निलंबीत जवानाची होती याचिका
अन्सारी अफताब अहमद यांनी दाढी ठेवणे हा माझ्या धार्मिक स्वातंत्र्याचा भाग असल्याचा दावा केला आहे. तसंच शीख जवानांना ज्याप्रमाणे मोठे केस ठेवण्याची आणि पगडी घालण्याची परवानगी मिळते त्याप्रमाणे आम्हालाही समान वागणूक मिळावी असं याचिकेत म्हटलं आहे. यावर न्यायालयाने ‘सर्व मुस्लिम दाढी ठेवत नाहीत. दाढी ठेवणं किंवा न ठेवणे हे पर्यायी असून दाढी ठेवणारे इस्लामधर्मीय अशी ओळख नाही आहे. मुस्लिम धर्मात केस कापणे किंवा दाढी करण्याला मनाई आहे असं म्हणू शकत नसल्याचं’, सांगत त्यांचा दावा फेटाळला आहे.