नवी दिल्ली : ओडिशाच्या मयुरभंज जिल्ह्यात झारखंडच्या सीमेजवळ भारतीय हवाई दलाचे एक विमान कोसळल. या अपघातात वैमानिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
हे भारतीय हवाई दलाचे हॉक अॅडव्हान्स्ड प्रशिक्षण विमान होते. खडगपूरमधील कलाईकुंड या हवाई तळावरून या विमानाने उड्डाण घेतले होते. मागील महिन्यात आसामच्या मजुली बेटावर हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात दोन विंग कमांडर ठार झाले होते. वैमानिकांनी हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो निष्फळ झाला होता.