नवी दिल्ली। भारतीय वायुसेनेच्या अत्याधुनिक सुखोई लढाऊ विमानांपैकी एक विमान आसाममध्ये बेपत्ता झाले आहे. आसामधील चीनला लागून असलेल्या सीमारेषेजवळ सुखोई-30फ हे विमान बेपत्ता झाले आहे. या विमानात दोन पायलट होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आसाममधील तेजपूरपासून 60 किमी अंतरावर असताना सुखोई-30फ या विमानाचा हवाई दलासोबतचा संपर्क तुटला. या विमानाला अपघात होऊन ते कोसळले असावे, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. सुखोई-30फ या विमानात दोन विमान दोन वैमानिक होते आणि हे विमान नियमित सरावासाठी गेले होते. नियमित सरावासाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळात सुखोई-30फ या विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला आणि विमान अचानक बेपत्ता झाले.