हवाहवाईची एग्जिट!

0

श्रीदेवीचे पहाटे हृदय विकाराने अकाली निधन झाले. कलाकाराचे भूमिका जगणे काय असते ते जर बघायचे असेल तर श्रीदेवीचे सिनेमे पाहून आपल्याला कळते. खान युगातल्या प्रत्येक नटाला टक्कर देऊन सक्षमपणे आपले वेगळे स्थान निर्माण करणारी ती अचानक एग्झिट घेऊन निघून गेली आहे, यावर खरोखरच विश्‍वास बसत नाही. सहज सुंदर अभिनय आणि त्यातली निरागसता ही बहुदा श्रीदेवी जन्माला येतानाच घेऊन आली असावी. तीची वयाच्या 54 व्या वर्षि झालेली एग्जिट बॉलिवूडच्या चाहत्यांना खरोखरच सदमा देवून गेली आहे.

श्रीदेवी हे नाव बॉलिवूडच्या ईतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेले आहे. कलाकाराचे भूमिका जगणे काय असते ते जर बघायचे असेल तर श्रीदेवीचे सिनेमे पाहून आपल्याला कळते. सोलवा सावन मधून श्रीदेवीने 1978-79 च्या दरम्यान हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर 1997 पर्यंत पुढची 18-19 वर्षे ती हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य करत राहिली. श्रीदेवी म्हटले की समोर येतो तो तिचा हवा-हवाईचा डान्स किंवा मिस्टर इंडियामधले तिचे काँटे नहीं कटते ये दिन रात हे गाणे किंवा नगीना सिनेमातील तिने साकारलेली इच्छाधारी नागिणीची भूमिका. या सिनेमात श्रीदेवीने डोळ्यातून जे भाव व्यक्त केले आहेत त्याला तोड नाही. आज तिने जगाचा निरोप घेतला आहे या बातमीवर विश्‍वासच बसत नाही. अत्यंत निरागस आणि सोज्ज्वळ भाव तिच्या चेहर्‍यावर आपसूकच आलेले दिसून येते. सिनेमा डिजिटल होण्याआधीच्या जमान्यातील अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी.

80 ते 90 चे दशक गाजवणारी. खान युगातल्या प्रत्येक नटाला टक्कर देऊन सक्षमपणे आपले वेगळे स्थान निर्माण करणारी ती अचानक एग्झिट घेऊन निघून गेली आहे, यावर खरोखरच विश्‍वास बसत नाही. सहज सुंदर अभिनय आणि त्यातली निरागसता ही बहुदा श्रीदेवी जन्माला येतानाच घेऊन आली असावी. कारण दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तिने बालकलाकार म्हणूनच काम करायला सुरुवात केली. व्हॉट्स अ‍ॅप असेल किंवा इतर सोशल मीडिया श्रीदेवीने लहानपणी भूमिका केलेले अनेक फोटो आपल्या सगळ्यांच्याच पाहण्यात आहेत. श्रीदेवीचा जन्म तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. तिचे वडील पेशाने वकील होते. तिला एक सख्खी आणि दोन सावत्र बहिणी आहेत. थुनीवावन हा तिचा बालकलाकार म्हणून पहिला सिनेमा होता. या सिनेमात तिने मुरुगन ही देवाची भूमिका साकारली होती. ज्युली या हिंदी सिनेमातही श्रीदेवीच झलक दिसली होती. पण ती या सिनेमात मुख्य भूमिकेत नव्हती. पुढे 90 च्या दशकात मात्र तिने हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवली. हिम्मतवाला या सिनेमात तिने जितेंद्र सोबत काम केले. या सिनेमातले ताथय्या ताथय्या गाणेही चांगलेच हिट झाले. आजही त्या गाण्याच्या ओळी लोकांच्या ओठांवर आहेत. गेल्या वर्षभरात एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीतून अनेक दुःखद बातम्या येत आहेत. गेल्या 11 ते 12 महिन्यांत अनेक प्रसिद्ध कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला.

यामध्ये बॉलिवूडसह साऊथ आणि मराठी, भोजपुरी चित्रपटांतील कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. 2017 पासून आतापर्यंत विनोद खन्ना, ओमपुरी, रीमा लागू, अशा तब्बल 22 सेलीब्रेटीजनी गेल्या वर्षाभरात जगाचा निरोप घेतला. श्रीदेवीचे पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. तत्पुर्वि रीमा लागू यांचे 18 मे 2017 ला हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. मधुकर तोरडमल, 2 जुलै 2017 ला प्रदिर्घ आजाराने निधन, टॉम अल्टर, 29 सप्टेबर 2017 ला त्वचा रोगाने निधन, उमा भेंडे 19 जुलै हृदयविकारच्या झटक्याने निधन, सुमिता सन्याल 9 जुलै हृदयविकारच्या झटक्याने निधन, निरज होरा 14 डिसेंबर प्रदिर्ग आजाराने निधन, 30 नोव्हेंबर मल्याळम अभिनेता अबी याचे डेंग्युमुळे निधन, सिताराम पांचाळ यांचे 10 ॉगस्टला कर्करोगाने निधन, गिरीजा देवी यांचे 23 ऑक्टोबर हृदयविकारच्या झटक्याने निधन, इंदर कुमार यांचे 28 जुलै हृदयविकारच्या झटक्याने निधन, विनोद खन्ना 27 एप्रिल ब्लॅडर कॅन्सरने निधन, ओम पुरीचे 6 जानेवारी हृदयविकारच्या झटक्याने निधन, भरत भूपती राजू 24 जूनला अपघआती निधन, अंजली श्रीवास्तवची 29 जून आत्महत्या, रेखा सिंधू 5 मे अपघातात निधन, सागर चैगुलेचे 3 मार्च हृदयविकारच्या झटक्याने निधन, अमृत पाल 19 जून लिवर सोरासीसने निधन, प्रदीप कुमार 3 मे ला आत्महत्या, सोनीका चव्हाण 29 एप्रिल अपघातात निधन, बितास्ता साहा 7 फेब्रुवारी आत्महत्या, कृतीका चौधरी 13 जून ला हत्या झाली, राम मुखर्जी 22 ऑक्टोंबर दीर्घ आजाराने निधन झाले, अशी गेल्या वर्षाभरातील यादी आहे. 90 च्या दशकात नंबर वन अभिनेत्री कोण? अशा चर्चेला कायम श्रीदेवी असेच उत्तर होतेे. माधुरी आणि श्रीदेवीने आपसात कधीही स्पर्धा केली नाही. पण लोक त्यांच्यात तुलना करत. जाग उठा इन्सान या सिनेमाच्या सेटवर मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांच्या अफेअरच्या बातम्या त्यावेळी चांगल्याच रंगल्या होत्या. एका साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत मिथुन चक्रवर्तीने तर श्रीदेवी आणि त्याचे छुप्या पद्धतीने लग्न झाल्याचेही म्हटले होते. मात्र काही काळानंतर या जोडीची ताटातूट झाली. बोनी कपूर तिच्या आयुष्यात आला आणि त्यानंतर श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी लग्न केले. जुदाई सिनेमानंतर तिने काही काळासाठी ब्रेक घेतला. मात्र 2012 ला इंग्लिश विंग्लिश या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा पाऊल ठेवले.

या सिनेमाची घोषणा करण्यात आली तेव्हाच जल्लोष करत सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. एका व्यावसायिकाची इंग्रजी न येणारी पत्नी श्रीदेवीने ज्या ताकदीने साकारली त्याला जवाब नाही. त्यानंतर आला तो मॉम हा सिनेमा. या सिनेमातही श्रीदेवीच मुख्य भूमिकेत होती. मुलीवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेणारी खंबीर आई श्रीदेवीने साकारली. या दोन्ही सिनेमांना समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही गौरवले. इंग्लिश विंग्लिश या सिनेमासाठी तर श्रीदेवीला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सदमा या सिनेमातली मनोरुग्ण मुलीची भूमिका असेल तिचे ते मांजराच्या पिल्लाला पाहून ओरडणे असेल. किंवा चाँदनी सिनेमातली प्रियकरावर असीम प्रेम करणारी प्रेयसी असेल, नगीना सिनेमातली इच्छाधारी नागीण असेल. सगळ्याच भूमिका श्रीदेवीने अजरामर केल्या. चांदनी सिनेमात ऋषी कपूर आणि तिची जोडी होती. तसेच विनोद खन्ना यांचीही या सिनेमात भूमिका होती. प्रेमाचा त्रिकोण सांगणार्‍या यशराजच्या या सिनेमात श्रीदेवीने आपल्या अभिनयाने तर छाप सोडलीच पण रंगभरे बादलसे गाण्यात पार्श्‍वगायनही केले. तीची वयाच्या 54 व्या वर्षि झालेली एग्जिट अनेकांना सदमा देवून गेली आहे.