अमळनेर। धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील शेतकरी भास्कर पाटील यांनी हवा आणि पाणी यापासून रासायनिक खत निर्मितीचे संशोधन केले आहे. रासायनिक खत निर्मितीसाठी आवश्यक असलेला नायट्रोजन ऑक्साईड रूपांतरित करण्यात ते यशस्वी झाले आहेत. या नवीन खतनिर्मितीने सध्याच्या पद्धतीपेक्षा चार पट कमी ऊर्जा व खर्च लागणार आहे. सद्यःस्थितीत रासायनिक खत हे जगाच्या अर्धा लोकसंख्येच्या उत्पादन निर्मितीसाठी वापरले जाते. पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी त्याला पर्यायी पद्धत विकसित करणे हे श्री. पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान होते. यासाठी त्यांनी नेदरलँड येथे पीएचडीचे संशोधन सुरू केले. सध्या ते नेदरलॅण्ड येथे मल्टिनॅशनल कंपनीच्या स्ट्रॅटेजिक संशोधन समितीत कार्यरत आहेत. त्यांना नुकतेच नेदरलँड येथे संशोधन कार्यासाठी पीएचडी प्रदान करण्यात आली आहे.
पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी
पर्यायी पद्धत विकसित
सध्याच्या रासायनिक खत निर्मितीच्या पद्धतीत जास्त ऊर्जा लागते. अमोनिया बनविण्याची रासायनिक प्रक्रिया तयार करण्यासाठी जगाच्या एकूण ऊर्जा वापराच्या दोन टक्के ऊर्जा आवश्यक असते. 300 दशलक्ष एवढा कार्बनडाय ऑक्साईड हा जागतिक तापमान वाढीस जबाबदार असणार्या केमिकलला वातावरणात सोडतो. पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी त्याला पर्यायी पद्धत विकसित करणे हे श्री. पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान होते. यासाठी त्यांनी नेदरलँड येथे पीएचडीचे संशोधन सुरू केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव) यूडीसीटीचे माजी विद्यार्थी आहेत. 2007 मध्ये बी.टेक. (केमिकल इंजिनिअरिंग) या विषयात सुवर्णपदक मिळविले आहे. नेदरलॅन्ड येथे पीएचडीसाठी जाण्यासाठी त्यांनी मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथून पदव्यूत्तरचे शिक्षण घेतले. रासायनिक खत निर्मितीसाठी आवश्यक घटक कमीत कमी ऊर्जा वापरून शक्य होते. नायट्रोजन ऑक्साईड हे पाण्यामध्ये मिसळून ऍसिड बनते. वेगवेगळ्या पद्धतीने ते खत म्हणून पिकांना देता येणार आहे.
रसायन इंधन म्हणून वापर
या संशोधनाच्या यशस्वितेसाठी त्यांनी 15 वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय जर्नल्स प्रकाशित केले आहे. सध्या भास्कर पाटील यांनी विकसित केलेली टेक्नॉलॉजी नेदरलॅण्ड मध्ये हायड्रो कल्चर व ऍक्वा कल्चरसाठी लागणार्या द्रव खतनिर्मितीसाठी टेस्ट केली जात आहे. अतिरिक्त विजेला रसायनमध्ये रूपांतर करण्यासाठीदेखील हे वापरता येणार आहे. ते रसायन नंतर इंधन म्हणूनही वापरता येईल. श्री. पाटील यांनी विकसित केलेल्य पद्धतीत फक्त हवा आणि पाणी यांचीच गरज असल्याने तसेच अपारंपरिक ऊर्जेवर चालत असल्याने या पद्धतीचा दूर्मिळ ठिकाणी राहणार्या तसेच रासायनिक खतापासून वंचित असलेल्या शेतकर्यांना विशेष फायदा होणार आहे. युरोपमधील प्रतिष्ठित बारा विद्यापीठ व कंपन्यांनी करार केला आहे.