हस्तीच्या विद्यार्थ्यांचे एमटीएस परीक्षेत रश

0

दोंडाईचा । दोंडाईचा वि.प्र. हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, हस्ती पब्लिक स्कूल ज्यु कॉलेज, दोंडाईचा येथील तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेच्या दुसर्‍या फेरीकरिता निवड करण्यात आली. 28 एप्रिल रोजी संपन्न परीक्षा झाली. त्यातील दुसर्‍या फेरीतील विद्यार्थ्यांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली.रशस्वी विद्यार्थ्रांचे परिसरात कौतुक होत आहे.

यांनी मिळविले यश
यात प्रत्युष गणेश बंब, जैनेश जयदीप शेठ, ह्रितिक सुनील जैन या तिनही इयत्ता 10वी तील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या तिनही विद्यार्थ्यांची 29 मे रोजी जयहिंद कॉलेज, देवपूर धुळे येथे होणार्‍या मुलाखतीसाठी निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शाळेचे एम.टी.एस परीक्षा प्रमुख भूषण दीक्षित यांचे मार्गदर्शन लाभले. तर हस्ती स्कूल कमिटी चेअरमन कैलास जैन, सदस्य डॉ. विजय नामजोशी व प्राचार्य एस.एन. पाटील यांनी यशस्वीतांचे कौतुक केले. हस्ती स्कूल दरवर्षी नियमितपणे अशा स्वरूपाच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करते.