हस्ती पूर्व – प्राथमिक शिक्षिकांचे बनी लिडर प्रशिक्षण पूर्ण

0

दोंडाईचा। अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन असोसिएशनचे तीन राष्ट्रीय पुरस्कार व आयएसओ 9001-2015 मानांकन प्रात्प हस्ती पूर्व प्राथमिक स्कूल दोंडाईचा येथील 16 शिक्षिकांनी स्काउट गाईड चे बनी-टमटोला लिडरचे’ प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले. सदर प्रशिक्षणाचे आयोजन 6 ते 8 मे 2017 दरम्यान राज्य प्रशिक्षण केंद्र रामबाग, भोर, जि. पुणे येथे महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईड राज्य संस्था मुंबई यांच्या वतीने करण्यात आले होते. स्काउट गाईड विभागातील सर्वात लहान गट म्हणजे बनी. हा विभाग वय वर्ष 3 ते 6 गटातील पूर्व प्राथमिक विभागापासून शालेय जीवनाला सुरुवात करणार्‍या बालकांसाठी असतो.

प्री प्रायमरी स्कुलच्या शिक्षिकांना मार्गदर्शन
भारताचा भावी नागरीक क्रियाशिल, आकर्षक व नवनिर्माण क्षमता असलेला घडविण्यासोबत त्याच्या शारिरीक व बौध्दीक विकासाला चालना देता यावी या उद्देशाने बनी विभाग कार्य करते. यासाठी हस्ती प्रि प्रायमरीच्या स्कूलच्या 16 शिक्षिका बनी लिडर प्रशिक्षण कोर्समध्ये सहभागी झाल्या होत्या. विशेषत: या बनी टमटोला विभागात हस्ती पूर्व प्राथमिक विभागातील ज्यु. केजी व सि. केजी वर्गांच्या एकूण 324 नोंदणीही केली आहे.

यांनी घेतले यशस्वी प्रशिक्षण
या बनी लिडर प्रशिक्षणात शिक्षिकांनी बनीची गोष्ट, बनी कार्यक्रम व योजना, पात्रता, नेतृत्व, नियम, ध्येय आणि जबाबदार्‍यांचा समावेश होता. यासोबतच थोर नेत्यांची माहिती व्यक्तीगत स्वच्छता, सर्वांगीण व्यक्तीमत्व विकास आदी विषयी यशस्वी प्रशिक्षण घेतले. यात रेखा गाडेकर, स्मीता साठे, प्रिती पाठक, पुनम पाटील, लिना सोनवणे, योगीता पाटील, ज्योति बोरसे, शुभांगी मालपूरकर, विजया जाधव, मंजुषा मोरे, दिपमाला पाटील, कविता पाईल, माधुरी पाटील, भारती गोसावी, अश्विनी चौधरी, काजल गिरासे यांचा समावेश होता.

प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन
बनी लिडर प्रशिक्षण कोर्स यशस्वी रित्या पूर्ण करणार्‍या सर्व शिक्षिकांचे धुळे जिल्हा मुख्य आयुक्त शांताराम शेंडे, जिल्हाध्यक्ष माजी आमदार जयवंतराव ठाकरे, जिल्हा आयुक्त गाईड आशाताई रंधे, जिल्हा चिटणीस सुरेश सोनवणे, संघटन आयुक्त संतोष सोनवणे व हस्ती स्कूल चेअरमन कैलास जैन, सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. विजय नामजोशी, उपाध्यक्षा सुगंधा जैन आणि प्राचार्य एस.एन.पाटील, ज्युनियर कॉलेज प्राचार्य पराग पोळ व हस्ती स्कूल स्काऊट मास्टर किशोर गुरव यांनी अभिनंदन केले.