दोंडाईचा। दोंडाईचा परिसरात इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देण्यात अग्रेसर हस्ती पब्लिक स्कूल अॅन्ड ज्यु.कॉलेजने एस.एस.सी.परिक्षेत सलग 9व्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली. पंधरा वर्षापूर्वी स्व. शांतीलालजी जैन व कांतीलाल जैन या बंधूंनी दोंडाईचा शहरात इंग्रजी माध्यमाची हस्ती स्कूल सुरु केली. 2016-17 मध्ये एस.एस.सी. बोर्ड परिक्षेत 46 विद्यार्थी प्रविष्ट होते. यापैकी सोनाली महेश बोधवाणी हीने 98.60 टक्के गुणांसह दोंडाईचा शहरात प्रथम क्रमांक पटकावला तर अवनी प्रशांत पाठक हीने 98.00 टक्के गुण व स्नेहल सुधाकर पाटील हीने 96.40 टक्के गुण प्राप्त करीत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
4 विद्यार्थ्यांना 95 टक्के पेक्षा जास्त
4 विद्यार्थ्यांनी 95 टक्के पेक्षा जास्त, 14 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त, 11 विद्यार्थ्यांनी 85 टक्के पेक्षा जास्त, 7 विद्यार्थ्यांनी 80 टक्के पेक्षा जास्त तर 9 विद्यार्थ्यांनी 75 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले. 5 विद्यार्थ्यांनी गणित विषयात व 3 विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयात 100 पैकी 99 गुण मिळविले. हस्ती स्कूल विद्यार्थ्यांच्या यशाचे कारण म्हणजे विद्यार्थी व शिक्षक यांची मेहनत, भरपूर सराव परीक्षा, डिजीटल वर्गात अभ्यासाची सोय व बाहेरील विषय तज्ञांचे मार्गदर्शन व उद्बोधन वर्गांचे आयोजन. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना अभ्यास करणे सोयीचे झाले अशा प्रतिक्रिया पालक महेश बोधवाणी, प्रशांत पाठक, सुधाकर पाटील, जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या.
गुणवंतांचे कौतुक : सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक यशवंत स्वर्गे, शालेय समिती चेअरमन कैलास जैन, व्हा.चेअरमन दिलीप वाघेला, हस्ती बँक व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कुचेरिया, शालेय सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. विजय नामजोशी, संचालक मंडळ तसेच प्राचार्य एस.एन.पाटील, प्राचार्य पराग पोळ यांनी कौतुक केले.