हस्ती स्कूलमध्ये स्काऊट-गाईड तर्फे सर्वधर्म प्रार्थना

0

दोंडाईचा । शहरातील हस्ती पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड कनिष्ठ महाविद्यालयात स्काऊट-गाईड विभागातर्फे शनिवार 19 ऑगस्ट रोजी सर्वधर्मीय प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख म्हणून अखिल भारतीय बौद्ध भिक्शू महासंघाचे गुणवंता महाथेरो हे लाभले. यावेळी शाळचे प्राचर्य एस.एन.पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पराग पोळ यांची उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी ’जिथे जन्म आहे तिथे दुःख व मृत्यू अटळ आहे, त्यासाठी माणसाचे अध्यत्मिक समाधान महत्वाचे असून माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे हाच खरा माणूसकीचा धर्म आहे‘ असे प्रतिपादन महाथेरो यांनी केले. बौद्ध धर्मातील त्रिसरण, पंचशिल, अष्टंगिक मार्ग, परिणीता आदी तथागत बुद्धांच्या तत्वज्ञानाचा उलगडा करीत उद्बोधनपर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेचे स्काऊट मास्टर, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी यांनी परीश्रम घेतले.