हस्ती स्कूल येथे ‘राष्ट्रीय ग्रंथपालदिन’ साजरा

0

दोंडाईचा। हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत, हस्ती पब्लिक स्कूल अ‍ॅन्ड ज्यु.कॉलेज, दोंडाईचा येथे ग्रंथालय चळवळीचे पितामह पद्मश्री डॉ.एस.आर.रंगनाथन यांची जयंती राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून शालेय समिती चेअरमन कैलास जैन यांच्या मार्गदर्शनाने साजरा करण्यात आली. शाळेचे प्राचार्य एस.एन. पाटील यांच्याहस्ते डॉ.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. प्रास्ताविकात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट करतांना सदाशिव महाजन यांनी ग्रंथ, वाचक व ग्रंथपाल या त्रिमुर्तींचे एकत्रित येणे म्हणजे ग्रंथालय असे सांगितले. तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी पुस्तकांचे व ग्रंंथांचे वाचन करतांना ’वाचाल तर वाचाल’ हा उद्देशन ठेवता ’वाचाल तर समृद्ध व्हाल’ ह्या जाणीवेने वाचन करावे, असे म्हटले.

मान्यवरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
तसेच हस्ती स्कूल ग्रंथपाल किशोर माळी यांनी डॉ. रंगनाथन यांचा जीवन कार्यपट उपस्थितांसमोर मांडतांना, डॉ.रंगनाथन यांच्या दृष्टिकोनातील ग्रंथालय मार्गक्रमणाची सुत्रे सांगितली. यात ग्रंंथ उपयोगीता, प्रत्येक वाचकाला ग्रंथ मिळणे, प्रत्येक ग्रंथाला वाचक मिळणे, वाचकाचा वेळ वाचवणे, व ग्रंथालय वर्धिष्णू संस्था समजावून सांगितली. यानंतर प्राचार्य एस.एन.पाटील यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करतांना- विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासली पाहिजे. वाचनामुळे माणसाचे व्यक्तिमत्व व ज्ञान दोन्हींही समृद्ध होत असतात असे प्रतिपादन केले. तसेच यादिनाचे औचित्य साधून शाळेत पुस्तक प्रदर्शनही लावण्यात आले. यशस्वीतेसाठी हस्ती स्कूलचे गृंथपाल किशोर माळी, सहा.ग्रंथपाल भुषण रणधीर यांनी कामकाज पाहिले.