जळगाव । महापालिका प्रशासनाने बळिराम पेठ, सुभाष चौक, शिवाजी रोड येथील हॉकर्सचे स्थलांतर हे ख्वॉजामीया झोपडपट्टीच्या जागेवर महासभेच्या ठरावानुसार काम हाती घेतले आहे. ही कारवाई करतांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शनिपेठ व शहर पोलिस ठाण्यात पोलिस बंदोबस्त मिळावा याबाबत महापालिकेतर्फे पत्र शनिपेठ व शहर पोलिस ठाण्याला बुधवारी देण्यात आले आहे. बळीराम पेठ, सुभाष चौक, शिवाजी रोड येथील 782 हॉकर्सचे स्थलांतर हे महासभेच्या ठरावानुसार तात्पुरत्या स्वरूपात या हॉकर्सला जागा दिली जाणार आहे. या हॉकर्सचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया करण्यात आली. परंतू पहिल्याच दिवशी स्थलांतराची कारवाई करतांना सुभाष चौकात अतिक्रमण कर्मचारी व भाजी विक्रेते यांच्या वाद होवून हाणामारी झाली होती. पुुन्हा मनपातर्फे 2 ते 5 जूनपर्यंत हॉकर्स स्थलांतराची कारवाई होणार आहे. त्यानुसार शनिपेठ व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणारे बळीराम पेठ, सुभाष चौक, शिवाजी रोड मधील कारवाई करतांना पोलिस बंदोबस्तासाठी 5 पुरुष व 3 महिला पोलिस कर्मचारी द्यावे याबाबत पत्र दिले आहे.