हाऊसकार्टतर्फे गणेश आरास स्पर्धेचे आयोजन

0

घरी गणपती बसविणा-यांसाठी आकर्षक बक्षिसे
जळगाव – 
 तुमचा यंदाचाही गणेशोत्सव अधिक उत्साहवर्धक बनविण्‍यासाठी हाऊसकार्ट डॉट कॉमतर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही ऑनलाईन गणेश आरास स्पर्धा 2018 चे आयोजन करण्‍यात आले आहे. घरगुती आरासह आपल्या लाडक्या बाप्पाचा फोटो या वेबसाईटवर अपलोड करायचा आहे. या स्पर्धेसाठी 11 हजाराचे प्रथम बक्षिस असून 13-25 सप्टेंबरपर्यंत या स्पर्धेचा कालावधी आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा विनामुल्य आहे. स्पर्धकांना घरातील श्री गणेश आरासचा स्पर्धेचे उत्कृष्ठ दर्जाच्या कॅमेरा द्वारे काढलेला फक्त (1) एक फोटोग्राफ  HouseCaart च्या  Android App अपलोड करायचा आहे.

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे वेध लागलेले आहे. मंडळे बाप्पाच्या आगमनासाठी ज़य्यत तयारी करीत आहे. अशातच लाखो लोक आपल्या घरीपण लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी उत्सुक असून त्यांनीपण सजावटीसह जय्यत तयारी केली आहे. अशाच लाखो कुटुंबासाठी ज्यांनी बाप्पाच्या आगमनासाठी उत्कृष्ट आरास तयार केली असेल त्यांच्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्‍यात आली आहे. ऑनलाईन स्पर्धेत सहभागी झालेल्यांच्या घरातील गणेश आरास या जगभरात पाहिल्या जाणार आहेत. प्रवेश विनामूल्य आहे. स्पर्धेचा निकाल हा ऑनलाईन व्होटींगच्या मदतीने होणार आहे. या स्पर्धेत ज्यांना जास्तीत जास्त गुण मिळतील त्या स्पर्धकांना तीन बक्षिसे आयोजकांकडून देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम बक्षिस – रुपये 11000/-, द्वितीय बक्षिस रुपये 5100/-, तृतीय बक्षिस रुपये  3100/- अशा पारितोषिकांचा समावेश आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील गृह गणपती आरास असलेल्या घरातील कोणतीही एक व्यक्ती भाग घेण्यासाठी पात्र आहेत.

भाविकानी आरास बघण्यासाठी आणि www.HouseCaart.com या वेबपोर्टल वर किंवा HouseCaartच्या Android App, log in करून एका मोबाईल वर फक्त 2 दोन वोट देण्याचा नियम केलेला आहे. या स्पर्धेचा निकाल दिनांक ११ ऑक्टोबर 2018 रोजी जाहीर करण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्‍यात आले.